अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धात FRI दाखल; यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्यासंदर्भात केलं होतं ‘हे’ विधान

निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी आम आदमी पक्षासाठी वाईट बातमी समोर येत आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्धात FRI दाखल; यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्यासंदर्भात केलं होतं ‘हे’ विधान
Edited Image

FIR Registered Against Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उद्या म्हणजेच बुधवारी, 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा आहे. मात्र, निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी आम आदमी पक्षासाठी वाईट बातमी समोर येत आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध हरियाणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, अरविंद केजरीवाल यांच्या 'यमुनेचे पाणी विषारी बनवण्याच्या' विधानाबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरियाणातील शाहबाद पोलिस ठाण्यात अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जगमोहन मनचंदा नावाच्या व्यक्तीने केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळत असल्याबद्दल विधान केले होते. आता, पोलिसांनी केजरीवाल यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम 192, 196(1), 197(1), 248(अ), 299 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते केजरीवाल ?

अरविंद केजरीवाल यांनी आरोप केला होता की, 'भाजप 'घाणेरडे राजकारण' करून दिल्लीतील लोकांना तहानलेले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. हरियाणात भाजपचे लोक पाण्यात विष मिसळून दिल्लीला पाठवत आहेत. जर दिल्लीतील लोकांनी हे पाणी प्यायले तर अनेक लोक मरतील. यापेक्षा घृणास्पद काही असू शकते का?' केजरीवाल यांच्या या आरोपावर हरियाणा सरकारने गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्याच वेळी, निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना हरियाणाने यमुना नदीचे पाणी विषारी बनवल्याच्या त्यांच्या दाव्यांच्या समर्थनार्थ पुरावे सादर करण्यास सांगितले होते.

दिल्ली विधानसभा निवडणूक – 

उद्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल 8 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number