पूंछ येथे बस दरीत कोसळली; अपघातात प्रवासी जखमी, बचावकार्य सुरु

पूंछ जिल्ह्यातील घाणी-मेंढर परिसरात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस अचानक दरीत कोसळली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

पूंछ येथे बस दरीत कोसळली; अपघातात प्रवासी जखमी, बचावकार्य सुरु

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज सकाळी पूंछ जिल्ह्यातील घाणी-मेंढर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस अचानक दरीत कोसळली. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

सदर बस (नोंदणी क्रमांक JK02X-1671) मेंढर गावातून निघाली होती आणि नियोजित मार्गाने पुढे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. एका वळणावर बस थेट खोल दरीत कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनास्थळी आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलीस आणि लष्करी जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवासी गंभीर जखमी असून त्यांना मेंढर आणि राजौरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

सध्या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी रस्त्याची खराब अवस्था आणि तीव्र वळणामुळे हा अपघात घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून, अधिकृत सूत्रांकडून अपघाताची चौकशी सुरु आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number