नवीन वर्षात म्हणजेच 2026 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प कधी सादर करतील? याकडे संपुर्ण देशाचं लक्ष लागलेल होत. याची तारीख केंद्राकडून जाहीर झाली नव्हती, मात्र आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सनं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्या सलग 9 वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री ठरतील.
हेही वाचा- Pune News : पुण्यात निवडणूक रणधुमाळीत शिवसेना नेत्याच्या वाहनावर हल्ला; 'हे' कारण समोर
यंदाचे केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2026 ला म्हणजेच रविवारी वित्त मंत्री निर्मला सीतारमण सादर करतील. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात मोदी सरकारने 2017 पासून दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन पद्धत सुरू केली. मात्र, 2026 मध्ये हा दिवस सुट्टीचा म्हणजेच रविवार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प त्याच दिवशी मांडला जाणार की पुढील कामकाजाच्या दिवशी (2 फेब्रुवारी), याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता केंदाचे अर्थसंकल्प रविवारीच सादर केलं जाणार आहे.
यावेळी 28 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवाती होईल. 29 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्याचे असणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामकाज 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान असेल अशा दोन टप्प्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन आयोजित केलं जाणार आहे.