भर लग्नातून मुलगा किंवा मुलगी पळून गेल्याच्या बातम्या अनेकवेळा आपण ऐकल्या असतील, मात्र गुजरातच्या सुरतमध्ये मात्र या सगळ्यावर कडी झाली आहे. येथे चक्क वधूची आई आणि वराचे वडिलच मुलांच्या लग्नापूर्वी एकत्र पळून गेले.
गुजरातच्या सुरत मधील काटरगाव येथे राहणाऱ्या एका तरुण जोडप्याचं लग्न ठरलं होतं.
मात्र लग्नाच्या एक महिना आधीच अचानक नवऱ्या मुलाचे वडिल घरातून पळून गेले.
त्याचवेळी मुलीची आईदेखील तिच्या घरातून पळून गेल्याचं निदर्शनास आलं.
त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली.
काही दिवसांनी याबाबतीत जो उलगडा झाला, तो धक्कादायक होता.
ते दोघे ही एकत्र पळून गेले होते.
दोघांच्याही पूर्वायुष्याविषयी माहिती काढली असता, दोघांचंही लग्न होण्यापूर्वी तरुणपणी एकामेकांवर प्रेम असल्याचं समजून आलं.
त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होतं, मात्र त्यावेळई ते लग्न करू शकले नव्हते.
मात्र मुलांच्या लग्न ठरवताना दोघं एकमेकांसमोर आले आणि जुनं प्रेम त्यांना आठवून ते एकत्र पळून गेले असावे असा आमचा अंदाज त्यांच्या कुटुंबियांकडून वर्तवण्यात येतोय.