पोलिसांकडून भाजप नेत्यांची धरपकड

राज्यांतील निवडणुकांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण परत मिळवले आहे. मात्र, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात तीढा कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, यासाठी भाजपकडून मुंबई कार्यालय ते मंत्रायल असा धडक मोर्चा काढण्यात आला. भाजपच्या या मोर्च्यात अनेक बडे सहभागी झाले होते. यावेळी […]

पोलिसांकडून भाजप नेत्यांची धरपकड

राज्यांतील निवडणुकांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षण परत मिळवले आहे. मात्र, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासंदर्भात तीढा कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मध्यप्रदेश पॅटर्नप्रमाणे ओबीसी आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, यासाठी भाजपकडून मुंबई कार्यालय ते मंत्रायल असा धडक मोर्चा काढण्यात आला.

भाजपच्या या मोर्च्यात अनेक बडे सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनात मविआविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, भाजपा कार्यकर्ते, आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. भाजप नेते प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश आहेत आणि जर राज्य सरकार वेळेत ओबीसी राजकीय आरक्षण पुन्हा मिळवू शकले नाही तर या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याची वेळ येणार आहे. परंतू राज्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी ओबीसी आरक्षण लागू झालेलं असेल असा विश्वास कालच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number