‘संजय राऊतांच्या बरळण्याच्या आणि सामना संपादक पदाचा संबंध काय?’

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे. ‘संजयजी, काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी […]

‘संजय राऊतांच्या बरळण्याच्या आणि सामना संपादक पदाचा संबंध काय?’

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत निषेध व्यक्त केला आहे.

‘संजयजी, काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन’, असं ट्विट चित्र वाघ यांनी केलं आहे.

‘संजय राऊतजी, भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी अरे ला का रे करण्याची भाषा वापरता येते’, असंदेखील चित्र वाघ म्हणाल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number