‘लाथा घालीन म्हणता तेव्हा कारवाई का नाही?’

भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटलेले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठिशी भाजप नसेलही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत. ‘नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. मात्र भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी आहे. आम्ही […]

‘लाथा घालीन म्हणता तेव्हा कारवाई का नाही?’

भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटलेले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याच्या पाठिशी भाजप नसेलही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

‘नारायण राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही. मात्र भारतीय जनता पक्ष नारायण राणे यांच्या पाठीशी आहे. आम्ही राडा करत नाही. मात्र भाजप कार्यालयांवर हल्ला झाला तर आंदोलन करू’, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

शेरजीर उस्मानी महाराष्ट्रात येतो, देशाला शिव्या देतो, पण त्याच्यावर कारवाई नाही. पण नारायण राणेंच्या प्रकरणात, कायद्याच्या भाषेत हा गुन्हा नाही, पण त्याचे गुन्ह्यामध्ये रुपांतर करुन कारवाई करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, ‘मी कोणताही गुन्हा केलेला नाही, माझं वक्तव्य हे गुन्हा नोंदवण्याचं वक्तव्य नाही, कोणत्याही गुन्ह्याची मला कल्पना नाही, त्यामुळे ऐकीव माहितीवर मी बोलणार नाही’, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे. तसेच आमचंही सरकार केंद्रात आहे, राज्याची उडी कितपत जाते ते पाहुयात, असाही सूचक इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number