गेले अनेक दिवस सर्वच पक्ष कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करत होते. त्याचेच पडसाद कर्नाटकातील विधानसभा निवणुकीचे निकाल समोर आल्यावर दिसत आहेत. या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
फोडाफोडी करणाऱ्या भाजपाला कर्नाटकातील जनतेनं धडा शिकवला. आगामी निवडणुकीत चित्र काय असेल हे कर्नाटकनं दाखवलं आहे, असं म्हणत शरद पवारांनी मोदी-शहांवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात काँग्रेसला भाजपापेक्षा दुप्पट जागा मिळाल्या आहेत. जनतेचा भाजपावर रोष होता. सत्तेचा गैरवापर केल्यानं भाजपाचा पराभव झाला आहे. धर्म, जातीचं राजकारण जनतेला आवडत नाही.