BCCI New Rules: मैदानावर शिस्त हवीच! रियान पराग आणि राजस्थान रॉयल्सच्या ‘त्या’ प्रकरणांनंतर BCCI संतापले; आता IPL संघांवर होणार थेट कारवाई

राजस्थान रॉयल्सच्या वादानंतर रियान परागवर कारवाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संघांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.

BCCI New Rules: मैदानावर शिस्त हवीच! रियान पराग आणि राजस्थान रॉयल्सच्या ‘त्या’ प्रकरणांनंतर BCCI संतापले; आता IPL संघांवर होणार थेट कारवाई

नवी दिल्ली: आयपीएल 2026 च्या हंगामात मैदानातील थरारासोबतच मैदानाबाहेरील बेशिस्तीच्या घटनांनी क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संघांच्या वाढत्या घटना पाहता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (Board of Control for Cricket in India, BCCI) आता कमालीची आक्रमकता दाखवण्याचे ठरवले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, केवळ खेळाडूच नव्हे, तर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संपूर्ण फ्रँचायझींविरुद्ध आता कठोर पावले उचलली जातील. आयपीएलची जागतिक प्रतिमा डागाळू नये, यासाठी बीसीसीआयने हे कडक धोरण अवलंबले आहे.

सैकिया यांचा फ्रँचायझींना निर्वाणीचा इशारा

महिला टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर देवजीत सैकिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयपीएलमधील बेशिस्तीच्या मुद्द्यावर भाष्य करताना सांगितले की, "आम्ही आयपीएलच्या नियम आणि प्रोटोकॉलचा आढावा घेत आहोत. विशेषतः संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंचे वर्तन यावर आमचे बारीक लक्ष आहे. हा केवळ एका खेळाडूचा किंवा अधिकाऱ्याचा प्रश्न नसून संपूर्ण संघाचा विषय आहे. त्यामुळे मर्यादांचे उल्लंघन झाल्यास आम्हाला ठोस कारवाई करावीच लागेल."

हेही वाचा: Abhay Mokashi Passed Away: पत्रकारितेतील 'निर्भीड पर्व' संपले! मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे निधन

राजस्थान रॉयल्सच्या 'त्या' दोन घटनांनी वेधले लक्ष

चालू आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ दोन वेगवेगळ्या वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत आला. पहिल्या घटनेत संघाचे मॅनेजर रविंदर सिंग भिंडर डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरताना आढळले. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकासमोर त्यांनी ही चूक अनवधानाने झाल्याचे सांगत माफी मागितली असली, तरी त्यांच्यावर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, यानंतर काही दिवसांतच राजस्थानचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये 'वेपिंग' (ई-सिगारेट) करताना कॅमेऱ्यात कैद झाला.

रियान परागला बसला मोठा फटका

कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत असताना रियान परागने केलेले हे वर्तन शिस्त भंग करणारे ठरले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत बीसीसीआयने परागच्या मॅच फीमधील 25 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय घेतला आणि त्याला एक 'डिमेरिट पॉईंट' देखील दिला. या घटनांमुळे आयपीएलच्या शिस्तपालन समितीने आता अधिक कडक नियमावली तयार करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा गैरवर्तनाला आळा बसेल.

सकारात्मक वातावरणासाठी प्रयत्न सुरू

राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी या वादांवर त्यांची बाजू मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, फ्रेंचायझीने या दोन्ही प्रकरणांमध्ये अंतर्गत सुधारणा केल्या असून वाद मिटवले आहेत. संघ नेहमीच मैदानावर आणि मैदानाबाहेर एक सकारात्मक आणि निकोप वातावरण राखण्याचा प्रयत्न करत असतो, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, बीसीसीआय आता केवळ स्पष्टीकरणावर समाधानी नसून प्रत्यक्ष कारवाईच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेत सरकारची मोठी कारवाई; ई-केवायसीच्या चाळणीत 54 लाख अर्ज बाद, आता या महिलांना…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number