Vaibhav Suryavanshi: BCCI कडून मोठी घोषणा! वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री; तर ‘या’ खेळाडूच्या गळ्यात पडली कर्णधार पदाची माळ

या संघात युवा प्रतिभेला प्राधान्य देण्यात आले असून, सर्वांत मोठी चर्चा बिहारच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची होत आहे.

Vaibhav Suryavanshi: BCCI कडून मोठी घोषणा! वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री; तर ‘या’ खेळाडूच्या गळ्यात पडली कर्णधार पदाची माळ

Vaibhav Suryavanshi: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेत होणाऱ्या आगामी एकदिवसीय त्रि-मालिकेसाठी 'इंडिया अ' (India 'A') संघाची घोषणा केली आहे. या संघात युवा प्रतिभेला प्राधान्य देण्यात आले असून, सर्वांत मोठी चर्चा बिहारच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची होत आहे. 9 जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत, यजमान श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे 3 संघ आमनेसामने असतील.

वैभव सूर्यवंशीवर बीसीसीआयचा विश्वास
या निवडीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे डावखुरा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी. अवघ्या 15 व्या वर्षी भारतीय 'अ' संघात स्थान मिळवून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्यासोबतच अनुभवी युवा खेळाडू तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करणार असून, अष्टपैलू रियान पराग उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळेल.

IPL स्टार्सना मिळाली संधी; प्रियांश आणि प्रभसिमरनची वर्णी
2026 च्या आयपीएल हंगामात आपल्या फलंदाजीने धमाका करणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयने बक्षीस दिले आहे. पंजाब किंग्जसाठी चमकदार कामगिरी करणाऱ्या प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या जोडीला संघात स्थान मिळाले आहे. अंशुल कंबोज, यश ठाकूर, विपराज निगम, आयुष बडोनी आणि हर्ष दुबे यांसारख्या खेळाडूंना संधी देऊन संघ संतुलित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मालिकेसाठीचा पूर्ण संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (उपकर्णधार), आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान.

हेही वाचा – RCB vs KKR IPL 2026 : कोहलीच्या 'विराट' धावा! KKR वर 6 गडी राखून विजय; RCB नं पटकावलं अव्वल स्थान

असे असेल टीम इंडियाचे वेळापत्रक
या मालिकेतील सर्व सामने श्रीलंकेतील दांबुल्ला येथील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. भारताचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

9 जून: भारत विरुद्ध श्रीलंका 'अ'
11 जून: भारत विरुद्ध अफगाणिस्तान 'अ'
15 जून: भारत विरुद्ध श्रीलंका 'अ' (दुसरी लढत)
17 जून: भारत विरुद्ध अफगाणिस्तान 'अ' (दुसरी लढत)
21 जून: अंतिम सामना (गुणतालिकेतील अव्वल दोन संघ)
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number