कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील ६१ वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नराधमाने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला असून या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला आहे. कोल्हापूरमध्ये इतकी धक्कादायक घटना घडूनही अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या संस्था मात्र गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे. याप्रकरणी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

कोल्हापुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यातील ६१ वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या नराधमाने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला असून या पीडित मुलीने बाळाला जन्म दिला आहे. कोल्हापूरमध्ये इतकी धक्कादायक घटना घडूनही अन्यायाविरूद्ध लढणाऱ्या संस्था मात्र गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.

याप्रकरणी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संजयनगर पोलिसांनी हा गुन्हा हातकणंगले पोलिसांकडे वर्ग केला. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली असून नराधमाला अटक करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले इथल्या दर्गा चौक परिसरात नंदकुमार चंद्रकांत हा नराधम राहतो. हा नराधम खाजगी सावकारी करतो. त्यामुळे या सावकीरीच्या माध्यमातून त्याचा पीडित मुलीच्या कुटुंबाशी ओळख होती. तसेच तो पीडित मुलीचा मानलेला मामा म्हणुन वावरत होता.

या गोष्टीचा फायदा घेत पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध नराधमाने आपल्या नवीन बांधकामावरील पत्र्याच्या शेडमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केले. ती गर्भवती राहील्यानंतर तिच्यावर सांगली येथे उपचार सुरु होते. यातुन पीडितेने एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर नातेवाईकांनी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ती तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल करण्यात आली आहे. हातकणंगले पोलीसांनी नंदकुमार निगवे याला अटक केली असून या आरोपीला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number