गुवाहाटीत गुरुवारी आसाम विधानसभेने बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 पारित करत एक कडक आणि कठोर निर्णय जाहीर केला. या कायद्यानुसार आता एका पेक्षा अधिक विवाह करणाऱ्या पुरुषांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे आणि दोषी आढळल्यास जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवासाची तरतूद ठेवण्यात आली आहे. काही विशेष अपवाद वगळता हा कायदा अत्यंत कठोर स्वरूपात लागू होणार आहे. नवीन कायद्याप्रमाणे अनुसूचित जमाती आणि सहाव्या अनुसूचि अंतर्गत असलेल्या भागांना सवलत देण्यात आली असली तरी इतर सर्व समाजांवर हा कायदा समानपणे लागू होणार आहे.
मुख्यमंत्री सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी विधानसभेत स्पष्ट केले की हा कायदा कोणत्याही धर्माला लक्ष्य करणारा नसून समाजातील स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. सरमा यांनी चेतावणी देत सांगितले की “दुसरा विवाह लपवून करणे, फसवणूक करून स्त्रीची फसवणूक करणे आणि कुटुंब नष्ट करणे याला आता कोणतीही मुभा नाही. हा कायदा पुरुषांवरील कारवाई अधिक कठोर बनवणार आहे.” समाजात “विवाह फसवणूक” करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी पुढील सत्रात स्वतंत्र विधेयकही सादर केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांनी स्पष्ट केले, “लव्ह जिहादसंबंधी जे आश्वासन दिले आहे, ते आम्ही प्रत्यक्षात आणणारच.”
Before the State Assembly passed the Assam Prohibition of Polygamy Bill, 2025, Assam CM Himanta Biswa Sarma said, "Islam can't promote polygamy. If this bill passes, then you will get a chance to be a true Muslim. This bill is not against Islam. The true Islamic people will… pic.twitter.com/fhJdPjA38O — ANI (@ANI) November 27, 2025
हेही वाचा: Hong Kong Fire Tragedy: मानवनिर्मित आपत्ती? हॉंगकॉंग आगीत 94 मृत, रहिवाशांचे गंभीर आरोप
समान नागरी कायद्यासाठीची पायाभरणी
विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री सरमा यांनी सर्व विरोधकांना दुरुस्त्या मागे घेण्याचे आवाहन केले, कारण महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एकमताची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “पुढील निवडणुकीनंतर आम्ही परत सत्तेत आलो तर Uniform Civil Code (UCC) लागू करून राज्यात एकच कायदा लागू करू,” असे सांगत त्यांनी स्पष्ट दिशा दिली की बहुपत्नीत्व बंदी ही Uniform Civil Code कडे जाणारी पहिली पायरी आहे.
विवाह लपवल्यास पुरुषांची अडचण वाढणार
नव्या कायद्यातील सर्वात कठोर तरतूद म्हणजे एखाद्या पुरुषाने मागील लग्नाची माहिती लपवून दुसरा विवाह केल्यास त्याला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. केवळ तेवढेच नाही, तर अशा प्रकरणात विवाह करवणाऱ्या पुजारी, काझी किंवा धार्मिक प्रमुखांनाही 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1.5 लाख रुपये दंड होऊ शकतो. या विधेयकामुळे विवाहाच्या नावाखाली स्त्रियांना फसवणाऱ्या, दुसरा विवाह लपविणाऱ्या किंवा बहुपत्नीत्वाला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांसाठी आता परिस्थिती अत्यंत कठोर होणार आहे. सरकारचे म्हणणे स्पष्ट आहे. स्त्री फसवणूक करणाऱ्या पुरुषांवर तडाखेबंद कारवाई होणारच, आणि हा कायदा त्या दिशेने महत्वाचा टप्पा आहे.