नवी दिल्ली, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला बुधवार ३० ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. या स्पर्धेत तेरा एकदिवसीय सामने होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी आशिया चषकाच्या निमित्ताने शनिवार २ सप्टेंबर २०२३ रोजी आमनेसामने असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक
सर्व सामन्यांचे भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून थेट प्रक्षेपण
बुधवार ३० ऑगस्ट २०२३ – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ. गट अ
गुरुवार ३१ ऑगस्ट २०२३ – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, गट ब
शनिवार २ सप्टेंबर २०२३ – भारत विरुद्ध पाकिस्तान, गट अ
रविवार ३ सप्टेंबर २०२३ – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, गट ब
सोमवार ४ सप्टेंबर २०२३ – भारत विरुद्ध नेपाळ, गट अ
मंगळवार ५ सप्टेंबर २०२३ – अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, गट ब
बुधवार ६ सप्टेंबर २०२३ – अ गट पहिला विरुद्ध ब गट दुसरा
शनिवार ९ सप्टेंबर २०२३ – ब गट पहिला विरुद्ध ब गट दुसरा
रविवार १० सप्टेंबर २०२३ – अ गट पहिला विरुद्ध अ गट दुसरा
मंगळवार १२ सप्टेंबर २०२३ – अ गट दुसरा विरुद्ध ब गट पहिला
गुरुवार १४ सप्टेंबर २०२३ – अ गट पहिला विरुद्ध ब गट पहिला
शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ – अ गट दुसरा विरुद्ध ब गट दुसरा
रविवार १७ सप्टेंबर २०२३ – अंतिम सामना