Angaraki Sankashti Chaturthi 2026 : अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दुर्मिळ योग! राहु काळ, चंद्रोदय वेळ आणि पूजन विधी जाणून घ्या

6 जानेवारी 2026 रोजी पौष महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे.

Angaraki Sankashti Chaturthi 2026 : अंगारकी संकष्टी चतुर्थीचा दुर्मिळ योग! राहु काळ, चंद्रोदय वेळ आणि पूजन विधी जाणून घ्या

Angaraki Sankashti Chaturthi 2026 : इंग्रजी नववर्ष 2026ची सुरुवात अनेक शुभ योगांनी होत असून, याच पार्श्वभूमीवर मंगळवार, 6 जानेवारी रोजी पौष महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी साजरी होणार आहे. संकष्ट चतुर्थी आणि मंगळवार यांचा संगम म्हणजेच अंगारक योग, जो अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा केल्यास संकटांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे.

हिंदू परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. विघ्नहर्ता गणेश अडथळे दूर करून कार्यसिद्धीचा मार्ग मोकळा करतो. म्हणूनच संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणेश व्रतांमध्ये सर्वोच्च मानले जाते. कोट्यवधी भाविक या दिवशी उपवास करून बाप्पाची आराधना करतात.

अंगारक संकष्ट चतुर्थीचे महत्त्व

मंगळ ग्रहाशी संबंधित असलेली ही चतुर्थी विशेष मानली जाते. पुराणकथांनुसार मंगळाने गणेशाची कठोर तपस्या केली होती. त्यावर प्रसन्न होऊन गणपती बाप्पांनी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला ‘अंगारक चतुर्थी’ म्हणून ओळख दिली. त्यामुळे या दिवशी केलेली उपासना अनेकपटीने फलदायी ठरते, असे मानले जाते.

राहु काळ आणि शुभ वेळ

6 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:00 ते 4:30 या वेळेत राहु काळ राहणार आहे. या कालावधीत कोणतेही शुभ कार्य टाळणे उचित मानले जाते. मात्र, गणपती पूजन, मंत्रजप आणि नामस्मरण राहु काळातही करता येते.

संकष्ट चतुर्थी पूजन विधी

या दिवशी पहाटे स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. दिवसभर उपवास करून संध्याकाळी गणपती बाप्पाची पूजा करावी. मूर्तीवर शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा. अथर्वशीर्ष उपलब्ध असल्यास त्याचे पठण करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. जास्वंदाची फुले, दूर्वा, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करून आरती करावी.

चंद्रोदयाचे महत्त्व

संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यानंतरच उपवास सोडावा, असे शास्त्रात सांगितले आहे. चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पाचे स्मरण करत उपवास संपवावा.

श्रद्धेचा आणि संकल्पाचा दिवस

अंगारक संकष्ट चतुर्थी हा केवळ धार्मिक विधी नाही, तर श्रद्धा, संयम आणि सकारात्मक ऊर्जेचा दिवस आहे. मनोभावे गणपतीची उपासना केल्यास मानसिक शांतता, आरोग्य आणि यश प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या शुभ दिवशी बाप्पाचे नामस्मरण करत नववर्षाची सुरुवात मंगलमय करण्याचा संकल्प करूया.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number