Ajinkya Rahane Retirement : "हीच ती योग्य वेळ…" अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; व्हिडीओ शेअर करत 12 वर्षांचा प्रवास संपवला

भारतीय संघाचा अनुभवी अन् स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली.

Ajinkya Rahane Retirement : &quotहीच ती योग्य वेळ…&quot अजिंक्य रहाणेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; व्हिडीओ शेअर करत 12 वर्षांचा प्रवास संपवला

क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा अनुभवी अन् स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने म्हटलं की, “जीवनातील प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते आणि एक शेवटही. तो क्षण आला की त्याचा सन्मान करून पुढे जाणं गरजेचं आहे. माझ्या फलंदाजीप्रमाणेच मी योग्य वेळेवर नेहमी विश्वास ठेवला आणि आज मला वाटतं, आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.”

एकेकाळी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारासोबत भारताच्या कसोटी संघाच्या मधल्या फळीचा भक्कम आधारस्तंभ असलेला रहाणे, घसरत्या फॉर्ममुळे संघाबाहेर गेला. अजिंक्य रहाणेने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता, त्यानंतर त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर आता अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत बीसीसीआय, सर्व सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहेत. 

हेही वाचा- India CWG 2026 : ग्लासगोमध्ये तिरंगा फडकवला! हरजिंदर अन् गुलवीरच्या ऐतिहासिक कामगिरीने भारताची पदकसंख्या 12 वर

रहाणेचा भारतासाठी शेवटचा कसोटी सामना
अजिंक्यने रहाणेने भारतासाठी आपला शेवटचा कसोटी सामना 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचा शेवटचा सामना 2018 मध्ये, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. रहाणेने आतापर्यंत 85 कसोटी सामने खेळले असून 144 डावांमध्ये 38.46 च्या सरासरीने 5,077 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके झळकावली आहेत.

रहाणेचा 20 वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास 
अजिंक्य रहाणेने 2011 मध्ये T20I साठी पदार्पण केले होते. भारताकडून तीनही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकली होती. त्याचसोबत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2020-21 मालिकेत भारताचे कर्णधारपद भूषवत 36 धावांत सर्वबाद झाल्यानंतरही संघाला मालिकेत 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number