गावकऱ्यांनी केला बेडकांचा घटस्फोट!

तुम्ही आत्तापर्यंत सेलिब्रिटी कपल्सचा घटस्फोट ऐकला असेल, लोकांच्या घटस्फोट पाहिला असेल. मात्र ज्यांच्यात विवाह ही संकल्पनाच नसते, अशा जनावरांचा घटस्फोट पाहिलाय का? पण भोपाळमध्ये असा घटस्फोट घडवण्यात आलाय… तो ही चक्क बेडकांचा. हा काय प्रकार आहे, जाणून घेऊ. जून महिन्यात पाऊस उशीरा पडू लागला. त्यामुळे पाऊस वेळेवर पडावा यासाठी लोक देवाची प्रार्थना करत होते. मात्र […]

गावकऱ्यांनी केला बेडकांचा घटस्फोट!

तुम्ही आत्तापर्यंत सेलिब्रिटी कपल्सचा घटस्फोट ऐकला असेल, लोकांच्या घटस्फोट पाहिला असेल. मात्र ज्यांच्यात विवाह ही संकल्पनाच नसते, अशा जनावरांचा घटस्फोट पाहिलाय का? पण भोपाळमध्ये असा घटस्फोट घडवण्यात आलाय… तो ही चक्क बेडकांचा. हा काय प्रकार आहे, जाणून घेऊ.

जून महिन्यात पाऊस उशीरा पडू लागला. त्यामुळे पाऊस वेळेवर पडावा यासाठी लोक देवाची प्रार्थना करत होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे, की पाऊस थांबावा म्हणून लोक देवाची प्रार्थना करतायत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर मध्य प्रदेशातही अशी परिस्थिती पाहायला मिळतेय.

पाऊस पडावा यासाठी अनेक उपाय केले जातात. पूजा केल्या जातात, प्रार्थना केल्या जातात. बेडकांचं लग्न लावण्याचीही अशीच एक प्रथा आहे. बेडकांचं लग्न लावलं की लवकर पाऊस पडतो, असं म्हणतात. त्यामुळे मध्य प्रदेशातील इंद्रपूरी येथे बेडकांचा विवाह लावण्यात आला होता.

त्यानंतरच्या काळात मध्य प्रदेशात भीषण पाऊस पडला.

भोपाळमध्ये 24 तासात 48 मिमी पाऊस पडला आहे.

या पावसाने गेल्या 13 वर्षाचा रेकॉर्ड तोडला आहे.

ज्या इंद्रपुरीत बेडकांचा विवाहसोहळा रंगला होता, त्या  इंद्रपूरी भागात तर प्रचंड पाऊस पडून पूर आला.

आणकी पाऊस पडून लोकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागू नये, म्हणून इंद्रपुरीतील ओम शिव सेवा भक्ती मंडळाने वेगळीच शक्कल लढवली आहे.

ज्या बेडकांच्या विवाहामुळे पाऊस सुरू झाला, त्या बेडकांचा घडस्फोट करवून पाऊस थांबवण्याची कल्पना या मंडळाची आहे.

सध्या सर्वत्र याच घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. माणसांप्रमाणे बेडकांचे घटस्फोट घडवण्याची कल्पना सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरली आहे. आता बेडकांच्या विवाहामुळे पाऊस पडणं जशी अंधश्रद्धा आहे, तसंच बेडकांच्या घटस्फोटामुळे पाऊस थांबणं ही देखील अंधश्रद्धाच आहे. मात्र आता पाऊस थांबणार का, हा खरा प्रश्न आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number