Cricketer Health Update : 14 किलो वजन कमी झालं, संसर्ग थेट मेंदूपर्यंत पोहचला; ‘हा’ गोलंदाज दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त

एकेकाळी आपल्या भेदग गोलंदाजीने मैदान गाजवणारा अफगाणिस्तानचा गोलंदाज आता मृत्यूशी झुंजतोय. अफगाणी गोलंदाज शापूर जाद्रान याला एक दुर्मिळ आणि जीवघेणा आजार झाला आहे.

Cricketer Health Update : 14 किलो वजन कमी झालं, संसर्ग थेट मेंदूपर्यंत पोहचला; ‘हा’ गोलंदाज दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराने ग्रस्त

एकेकाळी आपल्या भेदग गोलंदाजीने मैदान गाजवणारा अफगाणिस्तानचा गोलंदाज आता मृत्यूशी झुंजतोय. अफगाणी गोलंदाज शापूर जाद्रान याला एक दुर्मिळ आणि जीवघेणा आजार झाला आहे. जाद्रान हा सध्या दिल्लीच्या एका रुग्णालयात दाखल असून त्याला आयसीयूमध्ये दाखल केलं आहे. 38 वर्षी जाद्रान हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस(HLH) या आजाराने ग्रस्त आहे.

त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून संसर्ग त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला आहे. ज्यामुळे याचा परिणाम त्याच्या वजनावर होत आहे. शपूरचे सुमारे 14 किलो वजन कमी झाले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याला प्रथम त्रास जाणवला त्यानंतर जानेवारीपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि सध्या तो HLH च्या चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटसाठी ही एक वाईट बातमी असून चाहत्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा- MI vs GT IPL 2026 : तिलक वर्माच्या विक्रमी शतकी खेळीने शुभमन गिलच्या GT संघाचा धुव्वा उडवला; MI च्या पराभवाची मालिका संपवली

जाद्रानला झालेल्या हेमोफॅगोसिटिक लिम्फोहिस्टियोसायटोसिस या दुर्मिळ आजाराचा त्याच्या अस्थिमज्जा, यकृत, प्लीहा आणि लिम्फ नोड्सवर गंभीर परिणाम होत आहे. अफगाणिस्तानमध्ये प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांना चांगल्या उपचारांसाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला. तपासणी क्षयरोगासह गंभीर संसर्ग झाल्याचं उघड झालं. एमआरआय आणि सीटी स्कॅन केल्यानंतर संसर्ग मेंदूपर्यंत पसरल्याचं दिसून आल आहे, ज्यामुळे त्याचे बोलणेदेखील बंद झाले आहे. याबाबतची माहिती त्याचा धाकटा भाऊ घमाई जाद्रान यांनी दिली. 

शापूर जाद्रान हा अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आहे, त्याने 2009 ते 2020 या काळात अफगाणिस्तानसाठी भेदक गोलंदाजी केली. 2009 ते 2019 दरम्यान त्याने 44 वनडे आणि 36 टी20 सामने खेळले आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 43 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 37 बळी घेतले. याव्यतिरिक्त, शापूर जाद्रानने 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 विकेट्से घेतले. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक संघांना अडचणीत आलं आहे. इतकंच काय अफगाणिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number