अभिनेत्री राधा सागर हिचे दुसरं डोहाळे जेवण

मुंबई, १० जुलै, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री राधा सागर हिने काही महिन्यांपूर्वीच गोड बातमी देत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर तर महिन्याभरापूर्वीच तिचं डोहाळे जेवणही पार पडलं . यादरम्यान आता अभिनेत्री राधा सागरचे दुसरे डोहाळे जेवण पार पडले आहे. तिचं दुसरं डोहाळे जेवणसुद्धा अगदी थाटामाटात पार पडलं. यावेळचा तिचा व्हिडिओ आणि काही […]

अभिनेत्री राधा सागर हिचे दुसरं डोहाळे जेवण

मुंबई, १० जुलै, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री राधा सागर हिने काही महिन्यांपूर्वीच गोड बातमी देत आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर तर महिन्याभरापूर्वीच तिचं डोहाळे जेवणही पार पडलं . यादरम्यान आता अभिनेत्री राधा सागरचे दुसरे डोहाळे जेवण पार पडले आहे. तिचं दुसरं डोहाळे जेवणसुद्धा अगदी थाटामाटात पार पडलं. यावेळचा तिचा व्हिडिओ आणि काही खास फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री राधा हिने छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. अलीकडेच ती ‘ आई कुठे काय करते’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांमध्ये दिसली.तर आता तिच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावेळी अत्यंत पारंपरिक पद्धतीने तिचं डोहाळे जेवण पार पडले.

काही महिन्यांपूर्वी तिने आपण मालिकांमधून ब्रेक घेत मॅटर्निटी शूटचा व्हिडिओ सामायिक करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. तिच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्यानंतर तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो समोर आले होते. तेव्हाही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मोठ्या थाटामाटात तिचं डोहाळे जेवण पार पडलं आहे. तिने सर्व फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत. यात तिने जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर अशी फ्लोरल ज्वेलरी परिधान आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number