मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे ५६ विद्यार्थी ओमायक्रॉनबाधित

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ५६ विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली असता पुण्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला मात्र दिल्लीतील लॅबमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील ९६ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. सुरूवातीला महाविद्यालयाच्या वसतिगृहात ४८ विद्यार्थी कोरोबाधित आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये […]

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे ५६ विद्यार्थी ओमायक्रॉनबाधित

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ५६ विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. या विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली असता पुण्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला मात्र दिल्लीतील लॅबमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील ९६ विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते. सुरूवातीला महाविद्यालयाच्या वसतिगृहात ४८ विद्यार्थी कोरोबाधित आले. त्यानंतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पुन्हा ३४ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा १० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. असे एकूण ९६ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले. या विद्यार्थ्यांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली. दरम्यान या विदयार्थ्यांचे अहवाल पुणे आणि दिल्ली येथे पाठवण्यात आले. पुण्यातील या विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला मात्र दिल्लीतील अहवालात ९६ विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी ओमायक्रॉनबाधित असल्याचे समोर आले. या सर्व ५६ विद्यार्थ्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number