राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. तर विद्यार्थी, पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी लक्षात घेता, स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी शाळा सुरू झाल्या मात्र, बुलडाण्यातील एकाच शाळेतील २२ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
बुलडाणामधील एकाच शाळेतील २२ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील खामगावमधील अरजण खिमजी शाळेतील २२ शिक्षक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले असून आणखी ११३ शिक्षक कर्मचाऱ्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
अरजण खिमजी शाळेत ५ हजार ५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. तर आता एकाच वेळी शाळेतील २२ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, उद्यापासून २८ जानेवारीपासून बुलडाणा जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच अरजण खिमजी शाळेतील २२ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तसेच ११३ शिक्षक कर्मचार्यांचे कोरोना चाचणीचा अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासन चिंतेत आले असून विद्यार्थी-पालकांमध्ये शाळेत जाण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.