IPL 2020 च्या 13 व्या हंगामाची ‘ही’वैशिष्ट्यं माहिती आहेत का ?

IPL च्या 13 व्या हंगामासाठीची लीलावप्रक्रिया गुरुवारी पार पडली. IPL 2020 च्या हंगामासाठी एकूण 62 खेळाडूंची निवड (IPL 2020 Auction) करण्यात आली. या लीलावासाठी एकूण 997 खेळाडूंनी नोंदणी केली. यापैकी 332 खेळाडूंचीच अंतिम निवड केली गेली. यातून 62 खेळाडूंना 8 टीम्सनी खरेदी केलं.                      सर्वात वयस्कर खेळाडू IPL च्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडूचा मान प्रवीण […]

IPL 2020 च्या 13 व्या हंगामाची ‘ही’वैशिष्ट्यं माहिती आहेत का ?

IPL च्या 13 व्या हंगामासाठीची लीलावप्रक्रिया गुरुवारी पार पडली. IPL 2020 च्या हंगामासाठी एकूण 62 खेळाडूंची निवड (IPL 2020 Auction) करण्यात आली. या लीलावासाठी एकूण 997 खेळाडूंनी नोंदणी केली. यापैकी 332 खेळाडूंचीच अंतिम निवड केली गेली. यातून 62 खेळाडूंना 8 टीम्सनी खरेदी केलं.     

                
सर्वात वयस्कर खेळाडू

IPL च्या इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडूचा मान प्रवीण तांबे याला मिळाला आहे. वयाच्या 48 व्या वर्षी प्रवीण तांबेला कोलकातानाईट रायडर्सने खरेदी केलं आहे. प्रवीण तांबेसाठी कोलकात्याने 20 लाख मोजले आहेत.     

सर्वात महागडा परदेशी खेळाडू

ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स IPL इतिहासातील सर्वात महाग परदेशी खेळाडू ठरला आहे.

तर IPL इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडुंच्या बाबतीत दुसरा खेळाडू ठरला आहे.

कोलकाता टीमने पॅट कमिन्ससाठी 15.50 कोटी रुपये मोजले.

IPLच्या इतिहासातील युवराज सिंग  हा महागडा खेळाडू आहे.

दिल्लीने 2015 ला युवराजसाठी 16 कोटी मोजले होते.

पुणे टीमने बेन स्टोक्ससाठी 2017 ला 14.5 कोटीत खरेदी केले होते.    

‘या’ खेळाडूची IPLमधील 8 वी टीम

ऑस्ट्रेलियाच्या एरॉन फिंचला बंगळुरुने 4.40 कोटी रुपयांनी विकत घेतलं.

यासह फिंचने अनोखा विक्रम केला.

IPL मधील बंगळुरु टीम ही फिंचची 8 वी टीम ठरली आहे. याआधी फिंचने IPL मधील 7 टीम्सचं नेतृत्व केलं आहे.

‘हे’ खेळाडू ठरले ‘अनलकी’

IPLच्या लीलाव प्रक्रियेत काही खेळाडूंसाठी फ्रेंचायजीने कोटी रुपये मोजले. तर काही दिग्गज खेळाडूंना कोणीच खरेदी केलं नाही. खरेदी न केलेल्या काही खेळाडूंची नावं खालीलप्रमाणे

वेस्टइंडिजच्या जेसन होल्डर, कार्लोस ब्रॅथवेट आणि शाय होप या खेळाडूंना कोणीच खरेदी केलं नाही.

टीम इंडियाचे युसुफ पठाण, चेतेश्वर पुजारा आणि हनुमान विहारीदेखील दुर्देवी ठरले.

बांगलादेशचे मुस्तफिजुर रहमान आणि मुशफिकुर रहिम हे खेळाडू पण अपयशी ठरले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number