शमी आयपीएल खेळण्याची शक्यता मावळली

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल २०२४ स्पर्धा खेळण्याची शक्यता मावळली आहे. मोहम्मद शमी सध्या गुजरात टायटन्स संघाचा सदस्य आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ३३ वर्षांचा आहे. शमीने २०२२ च्या आयपीएलमध्ये वीस बळी आणि २०२३ च्या आयपीएलमध्ये २८ बळी घेतले होते. लागोपाठच्या दोन आयपीएलमध्ये प्रभावी गोलंदाजी करणारा मोहम्मद […]

शमी आयपीएल खेळण्याची शक्यता मावळली

नवी दिल्ली, २२ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल २०२४ स्पर्धा खेळण्याची शक्यता मावळली आहे. मोहम्मद शमी सध्या गुजरात टायटन्स संघाचा सदस्य आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ३३ वर्षांचा आहे. शमीने २०२२ च्या आयपीएलमध्ये वीस बळी आणि २०२३ च्या आयपीएलमध्ये २८ बळी घेतले होते. लागोपाठच्या दोन आयपीएलमध्ये प्रभावी गोलंदाजी करणारा मोहम्मद शमी नोव्हेंबर २०२३ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताकडून क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला होता. हा सामना भारताने गमावला. नंतर पायाच्या दुखापतीमुळे शमीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे जमलेले नाही. आता तो आयपीएल खेळण्याची शक्यता मावळली आहे.

हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला. यामुळे २०२४ च्या आयपीएलमध्ये मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत गुजरात टायटन्स खेळणार आहे. आयपीएल २०२४ साठी गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number