क्रिकेटपटू मयांक अगरवालची तब्येत ढासळली

आगरतळा, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : क्रिकेटपटू मयांक अगरवालची तब्येत ढासळली आहे. मयांकला आगरतळा येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले आहे. सध्या मयांकवर उपचार सुरू आहेत. कर्नाटकच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मयांक रणजी सामन्यासाठी त्याच्या संघासोबत आगरतळा येथे आला होता. त्रिपुरा विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर तो संघासोबत परतत होता. विमानात त्याने पिण्यासाठी पाणी घेतले. हे पाणी पिताच त्याची […]

क्रिकेटपटू मयांक अगरवालची तब्येत ढासळली

आगरतळा, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : क्रिकेटपटू मयांक अगरवालची तब्येत ढासळली आहे. मयांकला आगरतळा येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केले आहे. सध्या मयांकवर उपचार सुरू आहेत.

कर्नाटकच्या क्रिकेट संघाचा कर्णधार मयांक रणजी सामन्यासाठी त्याच्या संघासोबत आगरतळा येथे आला होता. त्रिपुरा विरुद्धचा सामना जिंकल्यानंतर तो संघासोबत परतत होता. विमानात त्याने पिण्यासाठी पाणी घेतले. हे पाणी पिताच त्याची तब्येत बिघडली. तोंडाला आणि घशाला सूज आली. तब्येत ढासळल्यामुळे मयांकला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयांक ज्या बाटलीतले पाणी प्यायला ती बाटली जप्त करून फॉरेन्सिककडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number