प्रजासत्ताक दिनाचा सोहळा किती वाजता सुरू होणार ?

नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे. संचलन कर्तव्य पथावरून होणार आहे. संचलनाची सुरुवात विजय चौक येथून होणार आहे. कार्यक्रम प्रत्यक्ष घटनास्थळावरून ७७ हजार नागरिक बघू शकतील. यापैकी ४२ हजार जागा राखीव असतील तर इतर जागा नागरिकांसाठी खुल्या […]

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा किती वाजता सुरू होणार ?

नवी दिल्ली, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा शुक्रवार २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे. संचलन कर्तव्य पथावरून होणार आहे. संचलनाची सुरुवात विजय चौक येथून होणार आहे. कार्यक्रम प्रत्यक्ष घटनास्थळावरून ७७ हजार नागरिक बघू शकतील. यापैकी ४२ हजार जागा राखीव असतील तर इतर जागा नागरिकांसाठी खुल्या असतील. नियमानुसार या जागांवर बसून नागरिक प्रजासत्ताक दिनाचा सोहळा बघू शकतील. दूरदर्शनच्या माध्यमातून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातून नागरिकांना विकसित भारत आणि लोकशाहीच्या जन्मदात्र्या भारतमातेला बघण्याची संधी मिळणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन हे या सोहळ्याला अतिथी म्हणून उपस्थित असतील.

भारत शुक्रवारी ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. या अमृत महोत्सवी सोहळ्यासाठी महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथातही महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. कर्तव्य पथावर लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या वैद्यकीय विभागातील महिला अधिकाऱ्यांचे पथक तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दल यांच्या महिला जवान आणि अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक अशी दोन महिला जवानांची पथके संचलनात सहभागी होणार आहेत. तटरक्षक दलाच्या महिला जवानांचे पथक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व करणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांचे पथक तसेच सीमा सुरक्षा दलाच्या महिलांचे वाद्यवृंद पथक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी होणार आहे. कर्तव्य पथावर ३० चित्ररथ सादर होणार आहेत. यात महाराष्ट्राच्या चित्ररथाचाही समावेश आहे. एकूण १६ राज्य, सात केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालये यांचे चित्ररथ संचलनात सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंत दाखवण्यात आली आहे. चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा फिरवतांना दिसतात व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसत आहेत. त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवण्यात आला आहे. या दरबारात काही महिला आपल्या प्रश्नांसाठी उपस्थित असल्याचे दिसत आहेत. तर मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. तर शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number