अभिनेता साजिद खानचे कर्करोगाने निधन

मुंबई, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेता साजिद खानने वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होता. मात्र, साजिद ही लढाई हरला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून साजिद खान कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. शुक्रवारी म्हणजेच २२ डिसेंबरला त्यांचं निधन झाल्याची माहिती समीर खान याने दिली. साजिद खान […]

अभिनेता साजिद खानचे कर्करोगाने निधन

मुंबई, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेता साजिद खानने वयाच्या ७० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेता गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होता. मात्र, साजिद ही लढाई हरला.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून साजिद खान कॅन्सर आजाराने ग्रस्त होते. शुक्रवारी म्हणजेच २२ डिसेंबरला त्यांचं निधन झाल्याची माहिती समीर खान याने दिली. साजिद खान यांनी दुसरं लग्न केलं होतं त्यानंतर ते केरळमध्ये स्थायिक झाले होते. चित्रपट सृष्टीपासून ते दूर गेले होते आणि समाजहिताच्या कामात गुंतल्याचं समीर खान याने सांगितलं.

साजिद खान यांनी कमी काळ काम केलं होतं पण त्यांच्या अभिनयाची कौतुक झालं होतं. साजिद खान यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाने सर्वांना वेड लावलं होतं. साजिद खान यांनी मदर इंडिया या चित्रपटामध्ये सुनील दत्त यांच्या बिरजूची भूमिका साकारली होती. साजिद यांचं वय त्यावेळी अवघ ६ वर्षे होतं. साजिद खान यांनी कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, साजिद यांना सन ऑफ इंडिया या चित्रपटाने त्यांना देशातच नाहीतर जगात ओळख मिळाली होती. या चित्रपटातील त्यांनी केलेल्या कामाचंही चांगलं कौतुक झालं होतं. जिंदगी और तुफान, दहंस आणि हार्ट अँड डस्ट या चित्रपटांमध्येही साजिद यांनी काम केलं होतं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number