कुस्तीपटू साक्षी मलिक निवृत्त

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या संजय सिंह यांचा विजय झाला. यामुळे निराश झालेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली. साक्षीने २०१६ मध्ये भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले होते. पण नंतर साक्षी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे जास्त चर्चेत आली होती. या […]

कुस्तीपटू साक्षी मलिक निवृत्त

नवी दिल्ली, २१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या संजय सिंह यांचा विजय झाला. यामुळे निराश झालेल्या कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केली. साक्षीने २०१६ मध्ये भारताला रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून दिले होते. पण नंतर साक्षी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे जास्त चर्चेत आली होती. या प्रकरणात भारत सरकारने पी. टी. उषा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीशी बोलताना आंदोलक कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर केले नाही. अखेर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर साक्षी मलिक, बबिता फोगट आणि बजरंग पुनिया या आंदोलकांनी बृजभूषण यांच्यावर केलेले आरोप मागे घेतले आणि आंदोलन थांबवले. आंदोलन थांबल्यानंतर झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या संजय सिंह यांचा विजय झाला. या घडामोडींमुळे निराश झालेल्या साक्षीने निवृत्तीची घोषणा केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number