ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन

मुंबई, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठी मनोरंजनसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. मागील काही काळापासून त्यांच्यावर टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून रुग्णालयातून त्यांना दोनच दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले. राहत्या घरी रवींद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला. […]

ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे निधन

मुंबई, १३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठी मनोरंजनसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. ते घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. मागील काही काळापासून त्यांच्यावर टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे बघून रुग्णालयातून त्यांना दोनच दिवसांपूर्वी घरी पाठवण्यात आले. राहत्या घरी रवींद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला.

रवींद्र बेर्डे हे दिवंगत मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या याचे सख्खे भाऊ होते. दोघांनी निवडक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. रवींद्र बेर्डे यांना घरी आणण्यात आले. घरी आल्यानंतर काही तासांनी हृदयविकाराच्या झटक्याने रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले.

वयाच्या विसाव्या वर्षी, १९६५ मध्ये रवींद्र बेर्डे यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. पुढे त्यांनी मराठी चित्रपटांमधून तसेच टीव्ही मालिकांतून काम केले. रवींद्र बेर्डे यांनी ३०० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमधून काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांच्यासोबत रवींद्र बेर्डे यांनी अनेक चित्रपटांतून काम केले. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले.

रवींद्र बेर्डे यांना १९९५ मध्ये नाटकात काम करत असताना मंचावर हृदयविकाराचा झटका आला. यानंतर २०११ मध्ये त्यांना कर्करोग झाला.

रवींद्र बेर्डे यांचे निवडक गाजलेले चित्रपट : अनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सूनबाईचा भाऊ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number