भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच टी – २० सामन्यांची मालिका ४ – १ अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. भारत दक्षिण आफ्रिकेत तीन टी – २० सामन्यांची मालिका, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. […]

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ऑस्ट्रेलिया विरुद्धची पाच टी – २० सामन्यांची मालिका ४ – १ अशी जिंकल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. भारत दक्षिण आफ्रिकेत तीन टी – २० सामन्यांची मालिका, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा आफ्रिका दौरा १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टी – २० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना विश्रांती मिळावी यासाठी टी – २० आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळवले जाणार नाही. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला तिन्ही मालिकांसाठीच्या संघात संधी मिळाली आहे.

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन
मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल
मंगळवार २६ डिसेंबर २०२३ ते शनिवार ३० डिसेंबर २०२३ – पहिला कसोटी सामना, सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
बुधवार ३ जानेवारी २०२४ ते रविवार ७ जानेवारी २०२४ – दुसरा कसोटी सामना, न्यूलँड्स, केप टाऊन

भारतीय संघ

टी – २० : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
एकदिवसीय : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, रजत पाटीदार, साई सुदर्शन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार, दीपक चहर.
कसोटी : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्ण, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number