रायपूर, १ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रायपूर येथे शुक्रवारी चौथा टी – २० सामना होणार आहे. पण हा सामना होणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रायपूरच्या क्रिकेट स्टेडियमचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे. बिल भरले नाही म्हणून स्टेडियमचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. सामन्याचे आयोजन करायचेच असेल तर उच्च क्षमतेचे एक पेक्षा जास्त जनरेटर वापरून तात्पुरता वीज पुरवठा केला जाईल. या विजेच्या जोरावर रात्री प्रकाशात अर्थात फ्लड लाईट्समध्ये सामना खेळवला जाईल.
रायपूरच्या क्रिकेट स्टेडियमचा वीज पुरवठा तोडण्यात आला
वीज पुरवठा २००९ मध्ये तोडण्यात आला
दंडासह थकीत रक्कम ३.१९ कोटी रुपयांपेक्षा जास्त
स्टेडियमच्या देखभालीची जबाबदारी छत्तीसगडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची
स्टेडियममधील निवडक खर्चांची जबाबदारी क्रीडा विभागाची
वीज बिलाचे पैसे भरण्यावरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि क्रीडा विभागात मतभेद