वर्ल्डकप फायनलच्या पिचबाबत सर्वात मोठी अपडेट

अहमदाबाद, १८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण ११ पिच आहेत. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की कोणत्या पिचवर फायनल मॅच होणार आहे. पण ही गोष्ट स्पष्ट आहे की, मॅच अशा पिचवर होईल जेथे फिरकीपटूंना मदत मिळेल. पिचवर चेंडू चांगला वळेल. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण सामना […]

वर्ल्डकप फायनलच्या पिचबाबत सर्वात मोठी अपडेट

अहमदाबाद, १८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण ११ पिच आहेत. आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की कोणत्या पिचवर फायनल मॅच होणार आहे. पण ही गोष्ट स्पष्ट आहे की, मॅच अशा पिचवर होईल जेथे फिरकीपटूंना मदत मिळेल. पिचवर चेंडू चांगला वळेल. अशा परिस्थितीत टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण सामना जस जसा पुढे जाईल तसे फलंदाजी करणे अवघड होईल. कोलकाता येथील इडन गार्डन्सवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सेमीफायनल मॅचमध्ये असेच झाले होते.

क्रिकेटमध्ये नेहमी असे म्हटले जाते की, मोठ्या लढतीत प्रथम फलंदाजी करावी. कारण लक्ष्याचा पाठलाग करताना अनेकवेळा जास्त दबाव येतो. १९८३ साली भारताने १८३ धावा करून विजेतेपद मिळवले होते. २०१९ साली इंग्लंडला आक्रमक फलंदाजी असताना देखील २४२ धावा करता आल्या नव्हत्या. अखेर मॅच टाय झाली आणि सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला. त्यामुळे २०२३च्या फायनलमध्ये दोन्ही कर्णधार टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number