अहमदाबाद, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : वाघ बकरी चहा कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात ते पाय घसरून पडले. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला मार लागला आणि ब्रेन हॅमरेज झाले. अहमदाबादच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या निमित्ताने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या निमित्ताने जाणून भारतातील भटक्या कुत्र्यांची समस्या…
जगातील सर्वाधिक भटके कुत्रे भारतात
भारतातील सर्वाधिक भटके कुत्रे ओडिशा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात
भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक हल्ले भारतात
भारतातील भटक्या कुत्र्यांचे सर्वाधिक चावे तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात
बालके आणि वृद्ध भटक्या कुत्र्यांचे सहज लक्ष्य
भटक्या कुत्र्यांच्या ३६% हल्ल्यात पीडिताचा मृत्यू
कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीजचा संसर्ग
पशू नियंत्रण कायदा २००१ अन्वये भटक्या कुत्र्यांना ठार मारणे अशक्य