भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशला धक्का

पुणे, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात गुरुवारी भारत – बांगलादेश सामना रंगणार आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील हा साखळी सामना दोन दिवसांवर आला असताना बांगलादेशला धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध धावताना शकीब अल हसनला दुखापत झाली. या दुखापतीमुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. शकीबच्या दुखापतीमुळे बांगलादेश संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत वाढ […]

भारताविरुद्धच्या सामन्याआधी बांगलादेशला धक्का

पुणे, १७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यात गुरुवारी भारत – बांगलादेश सामना रंगणार आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील हा साखळी सामना दोन दिवसांवर आला असताना बांगलादेशला धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्ध धावताना शकीब अल हसनला दुखापत झाली. या दुखापतीमुळे बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. शकीबच्या दुखापतीमुळे बांगलादेश संघ व्यवस्थापनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. शकीबची दररोज तपासणी होत आहे. फिट असेल तरच तो भारताविरुद्ध खेळेल, नाहीतर त्याला विश्रांती दिली जाईल, असे बांगलादेश संघ व्यवस्थापनाने सांगितले.

यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेशचे प्रत्येकी तीन साखळी सामने खेळून झाले आहेत. भारताने तिन्ही साखळी सामने जिंकले आहेत तर बांगलादेशने त्यांचा तीन पैकी एक साखळी सामना जिंकला आहे. पुण्यातील सामन्याच्या निमित्ताने भारत विजयाची घोडदौड सुरू ठेवण्यास तर बांगलादेश दुसरा विजय मिळवण्यास उत्सुक आहे.

क्रिकेट विश्वचषक २०२३
भारत विरुद्ध बांगलादेश
गुरुवार १९ ऑक्टोबर २०२३
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
नाणेफेक : भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता
थेट प्रक्षेपण : भारतीय वेळेनुसार दुपारी दोन वाजल्यापासून

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number