नागपूर विमानतळावर जंगी स्वागत

नागपूर, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : एशियाड खेळात तिरंदाजीमध्ये तीन सुवर्णपदक मिळाल्यानंतर ओजस देवतळेच नागपुरात आगमन झालं. नागपूर विमानतळावर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. फुलांनी सजवलेल्या वाहनामध्ये त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्याच्या घरच्यांसोबत अनेकजण सहभागी झाले. हातात शाळेचे फलक घेत विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत करण्यात आलं… त्याला पुष्पगुच्छ देण्यात […]

नागपूर विमानतळावर जंगी स्वागत

नागपूर, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : एशियाड खेळात तिरंदाजीमध्ये तीन सुवर्णपदक मिळाल्यानंतर ओजस देवतळेच नागपुरात आगमन झालं. नागपूर विमानतळावर त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. फुलांनी सजवलेल्या वाहनामध्ये त्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्याच्या घरच्यांसोबत अनेकजण सहभागी झाले. हातात शाळेचे फलक घेत विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात त्याचं स्वागत करण्यात आलं… त्याला पुष्पगुच्छ देण्यात आला. त्याचं तोंड गोड करण्यात आलं. या प्रसंगी उपस्थित्यांनी जल्लोष केला. मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी फुगडीचे फेर धरले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number