नेहा ठाकूरला रौप्य, भारताला आशियाडमध्ये १२ पदके

हँगझोऊ, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत अर्थात आशियाडमध्ये भारताने आतापर्यंत बारा पदके जिंकली आहेत. नेहा ठाकूरने भारताला नौकानयनमध्ये रौप्य पदक जिंकवून दिले. हे भारताचे यंदाच्या आशियाडमधील बारावे पदक आहे. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्य पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत भारत सहाव्या स्थानी आहे. […]

नेहा ठाकूरला रौप्य, भारताला आशियाडमध्ये १२ पदके

हँगझोऊ, २६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : चीनमधील हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या स्पर्धेत अर्थात आशियाडमध्ये भारताने आतापर्यंत बारा पदके जिंकली आहेत. नेहा ठाकूरने भारताला नौकानयनमध्ये रौप्य पदक जिंकवून दिले. हे भारताचे यंदाच्या आशियाडमधील बारावे पदक आहे. भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि सहा कांस्य पदके जिंकली आहेत. पदक तालिकेत भारत सहाव्या स्थानी आहे.

१. भारताचा महिला क्रिकेट संघ – २० षटकांची क्रिकेट स्पर्धा – सुवर्ण पदक
२.रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रतापसिंह तोमर, दिव्यांशसिंग पनवार – पुरुष दहा मीटर एअर रायफल संघ – सुवर्ण पदक
३. नेहा ठाकूर – नौकानयन – मुलींची डिंगी, ILCA4 – रौप्य पदक
४. नीरज, नरेश कलवानिया, नीतेश कुमार, चरणजीत सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष, डीयू पांडे – रोइंग – आठ पुरुष – रौप्य पदक
५. आशी चौकसे, मेहुली घोष, रमिता जिंदाल – नेमबाजी – महिला दहा मीटर एअर रायफल संघ – रौप्य पदक
६. अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग – रोइंग – पुरुषांचे लाईट दुहेरी स्कल्स – रौप्य पदक
७. बाबू लाल यादव आणि लेख राम – रोइंग – पुरुष जोडी – कांस्य पदक
८. रमिता जिंदाल – नेमबाजी – महिलांची दहा मीटर एअर रायफल – कांस्य पदक
९. जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष – रोइंग – चार पुरुष – कांस्य पदक
१०. परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान, सुखमीत सिंग – चार पुरुष – कांस्य पदक
११. ऐश्वरी प्रताप सिंग तोमर – नेमबाजी – पुरुषांची दहा मीटर एअर रायफल – कांस्य पदक
१२. विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग, अनिश भानवाला – नेमबाजी – पुरुष पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल संघ – कांस्य पदक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number