पाकिस्तान ‘सुपर फोर’ मध्ये, भारत कुठे ?

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत चार सामने झाले आहेत. स्पर्धेतील पाचवा सामना सुरू आहे. साखळी फेरीचा आणखी एक सामना होणार आहे. यानंतर ‘सुपर फोर’ फेरी सुरू होणार आहे. अ गटात पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानने तीन गुणांसह ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश केला आहे. पण अ गटातून ‘सुपर फोर’ फेरीत […]

पाकिस्तान ‘सुपर फोर’ मध्ये, भारत कुठे ?

नवी दिल्ली, ४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत चार सामने झाले आहेत. स्पर्धेतील पाचवा सामना सुरू आहे. साखळी फेरीचा आणखी एक सामना होणार आहे. यानंतर ‘सुपर फोर’ फेरी सुरू होणार आहे. अ गटात पहिल्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानने तीन गुणांसह ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश केला आहे. पण अ गटातून ‘सुपर फोर’ फेरीत जाणारा दुसरा संघ अद्याप ठरायचा आहे. तसेच ब गटातून कोणते दोन संघ ‘सुपर फोर’ फेरीत जाणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे

अ गटात भारत एका गुणासह दुसऱ्या स्थानी तर नेपाळ शून्य गुणासह तिसऱ्या स्थानी आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात भारत जिंकला तर तीन गुणांसह ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश करेल. सामना बरोबरीत सुटला अथवा पावसामुळे पूर्ण खेळ झाला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत दोन गुणांसह भारत ‘सुपर फोर’ फेरीत प्रवेश करेल.

ब गटात श्रीलंकेने त्यांचा पहिलाच सामना जिंकत दोन गुणांसह पहिले स्थान पटाकवले आहे. बांगलादेशने त्यांच्या दोनपैकी एक सामना जिंकून दोन गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. अफगाणिस्तान शून्य गुणासह तिसऱ्या स्थानी आहे. आता श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामना मंगळवार ५ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number