गोव्यातील मिरामार समुद्रकिनारी नौदलाची बोट उलटून बुडाली आहे. मिरामार किनाऱ्यावरील मॅरियट रिसॉर्टजवळ शनिवारी ही घटना घडली आहे. उलटलेली बोट ही नौदलाची असून त्या बोटीत नौदलाचे दोन जवान होते. नौदलाच्या गस्तीनौकेने घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांची सुटका केली असून. दरम्यान बोटीचे स्टेअरिंग तुटल्याने ती बुडाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतंय. तसेच या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
गोव्यातील मिरामार समुद्रकिनारी नौदलाची बोट उलटून बुडाली आहे. मिरामार किनाऱ्यावरील मॅरियट रिसॉर्टजवळ शनिवारी ही घटना घडली आहे. उलटलेली बोट ही नौदलाची असून त्या बोटीत नौदलाचे दोन जवान होते.
नौदलाच्या गस्तीनौकेने घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांची सुटका केली असून. दरम्यान बोटीचे स्टेअरिंग तुटल्याने ती बुडाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतंय. तसेच या घटनेत जीवितहानी झालेली नाही.