सध्या कडाक्याच्या उन्हामुळे बहुतेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न समोर येत आहे. महाराष्ट्रात पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांना रणरणत्या उन्हात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याच गोष्टीकडे जय महाराष्ट्राने लक्ष दिले बातमीच्या पायामुळाशी जाऊन बातमी उचलून धरली आणि जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणाका बसला. जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर पालघर जिल्हा प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. सायवन भावरपाडा येथे टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. जय महाराष्ट्रने भावरपाडा येथील पाणी टंचाईची बातमी दाखवल्या नंतर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे. सायवन भावरपाडा येथे पाण्याचा प्रश्नावरून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आणि तेथील नागरिकांमध्ये काही प्रमाणात का असेना पाण्याचा प्रश्न कमी झाली आता नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही.
पालघर जिल्हा प्रशासनासाठी टँकरमुक्त असलेल्या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सायवन भावरपाडा या गावातील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. डहाणू तालुक्यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता नसल्याची प्रशासनाकडून सांगण्यात येत असला तरी सायमन भावरपाडा येथील नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर विहिरी सभोवताली रांगेत उभं राहावं लागयचं. मात्र तरीदेखील कुटुंबांना पुरेल इतकं पाणी मिळत नव्हत . डहाणू तालुक्यातील सायवन भावरपाडा या ८०० ते ९०० लोकवस्तीच्या गावात सध्या भीषण पाणी टंचाई जाणवत होती. गावात तब्बल १५ पेक्षा जास्त बोरवेल आहेत. मात्र हे सर्व बोरवेल नादुरुस्त आहेत. तसेच अनेक बोरवेलला पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्याने तळ गाठलेल्या एकाच विहिरीवर अवलंबून राहाव लागतय. साधारणतः हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन तास लागत असून येथील वृद्ध , महिला , चिमुकले नंबर लावण्यासाठी विहिरी भोवती ताटकळत उभे असायचे. गावात १०० पेक्षा अधिक कुटुंब राहत असून या कुटुंबांना पुरेल इतका पाणीपुरवठा सध्या या विहिरीतून होत नाही. त्यामुळे गुराढोरांना तर सोडाच नागरिकांनाही पुरेसे पाणी देखील मिळत नव्हते.