काही तासात सुरू होणारा भारत आणि पाकिस्तान महामुकाबला हा मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर रंगणार आहे. हा सामना पाहण्यासाठी जगभरातून क्रिकेटप्रेमींनी हजेरी लावली आहे. त्यामुळे या सामन्याचे तिकिट दर देखील गगनाला भिडलेले आहेत. या मैदानावरील सामान्य श्रेणीतील तिकिटं 17 हजार रुपयांपासून 27 हजारांपर्यंत विकली गेली. तर सर्वोच्च श्रेणीतील तिकिटं तब्बल 47 ते 62 हजार रुपयांपर्यंत विकली गेली.
अवघ्या काही तासात सुरू होणारा भारत आणि पाकिस्तान महामुकाबल्याकडे जगातील सर्वच क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागल आहे.
त्यामुळे या सामन्याचे तिकिट दर देखील गगनाला भिडलेले. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या तिकिटांना प्रचंड मागणी आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानाची आसनक्षमता 20 हजार इतकी आहे. तिकिटांची विक्री सुरू होताच काही तासांमध्येच सर्व तिकीटे संपली.
ब्रिटनमध्ये दोन्ही देशांचे नागरीक मोठ्याप्रमाणावर राहत असल्यामुळे इंग्लंडमधील अनेक वेबसाईट भारत-पाक सामन्यांच्या तिकीटाची विक्री करत आहेत.
या वेबसाईटनुसार त्यांच्याकडे जवळपास 480 तिकिट विक्रीसाठी आले, यामध्ये त्यांनी ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड आणि प्लॅटिनम तिकीटे होती.
यामध्ये ब्रॉन्झ आणि सिल्वर तिकिटांची विक्री पूर्ण झाली असुन ही तिकिटं 17 हजार रुपयांपासून 27 हजारांपर्यंत विकली गेली.
तर गोल्ड श्रेणीतील 58 आणि प्लॅटिनम श्रेणीतील 51 तिकिट शिल्लक राहिली होती. या तिकीटांच्या किमती त्यावेळीच तब्बल 47 ते 62 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या.
या दोन्ही श्रेणींमध्ये पाच हजार रुपयांचा फरक आहे, कारण दारु पिण्याची परवानगी असलेल्या श्रेणीतील किंमत अधिक आहे.
प्रेक्षक, खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित आनंददायी सामना पाहता यावा यासाठी स्कॉटलंड यार्ड पोलीस आयसीसी, इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत मिळून सर्व आवश्यक काळजी घेत आहेत.