युक्रेनच्या विद्यार्थ्यांना भारतात प्रशिक्षणाची मुभा

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या, मात्र प्रशिक्षण पूर्ण करू न शकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष प्रशिक्षण करता येणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा निर्णय घेतला आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशिक्षण क्षमता साडेसात टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना […]

युक्रेनच्या विद्यार्थ्यांना भारतात प्रशिक्षणाची मुभा

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या, मात्र प्रशिक्षण पूर्ण करू न शकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष प्रशिक्षण करता येणार आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतातील वैद्यकीय महाविद्यालयात एक वर्ष प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाची प्रशिक्षण क्षमता साडेसात टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क आकारावे लागणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण करताना स्टायफंडसुद्धा मिळणार असल्याचे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने स्पष्ट केले आहे.

युक्रेनमध्ये जवळपास २० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, गेल्या बारा दिवसांपासून युक्रेनमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष त्याच महाविद्यालयात प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण करता आले नाही, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number