परीक्षा विभाग घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले आयएएस अधिकारी अश्विनकुमार यांच्या तपासणीत नवी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, जीए सॉफ्टवेअर कंपनीने या संदर्भात शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपेला तीस लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण परिषदेचा माजी अध्यक्ष तुकाराम सुपेला जीए कंपनीने ही रक्कम का दिली असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच त्या रकमेच्या बदल्यात काय करण्यात आले, याचा तपासही महत्त्वाच ठरणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पैशाच्या बदल्यात काही विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र बनावट पद्धतीने तयार करण्यात आले. तसेच हा कारभार मुंबईतून करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.