अमरावतीत शिवप्रेमी आक्रमक; आयुक्तांवर शाईफेक

अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा पेटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अगांवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. अमरावती येथील राजापेठ उड्डाणपूलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनान हटवल्यामुळे शिवप्रेमा नाराज झाले होते. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून […]

अमरावतीत शिवप्रेमी आक्रमक; आयुक्तांवर शाईफेक

अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा पेटला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अगांवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे.

अमरावती येथील राजापेठ उड्डाणपूलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनान हटवल्यामुळे शिवप्रेमा नाराज झाले होते. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिवप्रेमींनी अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकली आहे. तसेच याप्रकरणी काही शिवप्रेमी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा अमरावती महानगरपालिकेने हटवला. यावेळी हा पुतळा हटवू नये अशी मागणी संघटनांनी केली होती. मात्र हा पुतळा हटवल्यामुळे युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number