८०० टन वजनाचे स्ट्रक्चर रेल्वे ट्रॅकवर लाँच करून महामेट्रोने नवा इतिहास रचला आहे. अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारे गड्डीगोदाम येथे ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था महामेट्रो निर्माण करत असून भारतीय रेल्वे ट्रॅकच्यावर ८० मीटर लांब आणि ८०० टन वजनाचे स्टील गर्डर महा मेट्रोने यशस्वीरीत्या लाँच केले असून नागपूर शहराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कार्याची निश्चितच नोंद झाली आहे.
आव्हानात्मक अश्या रेल्वे ट्रॅकच्यावर सुमारे ४.३० तासाचा रेल्वे ब्लॉक घेऊन सदर कार्य पूर्ण केले. गड्डीगोदाम क्रॉसिंगयेथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे.
या लोखंडी स्ट्रकचरची जमिनीपासून उंची २४ मीटर असून स्टील गर्डरची उंची ३२ मीटर व लांबी ८० मीटर व रुंदी १८ मीटर एवढे आहे व याचे एकूण वजन १ हजार ६५० टन इतके आहे. स्ट्रकचर उभारणी करतांना सुमारे ८०००० एएसएफजी बोल्टचा उपयोग करण्यात येणार आहे.