‘मुंबईत उपनगरीय सेवा थांबवण्याचा विचार नाही’ – राजेश टोपे

राज्यातील कोरोना रुग्णाच्य वाढत्या संख्येमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का? तसेच मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन बंद होणार का, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तुर्तास लॉकडाऊन लागणार नसून लोकल ट्रेनसुद्धा बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबईत उपनगरीय सेवा थांबवण्याचा विचार नसल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र […]

‘मुंबईत उपनगरीय सेवा थांबवण्याचा विचार नाही’ – राजेश टोपे

राज्यातील कोरोना रुग्णाच्य वाढत्या संख्येमुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का? तसेच मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेन बंद होणार का, यावर प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तुर्तास लॉकडाऊन लागणार नसून लोकल ट्रेनसुद्धा बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबईत उपनगरीय सेवा थांबवण्याचा विचार नसल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लावण्यावर चर्चा झाली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचे टोपे म्हणाले.

राज्यात तुर्तास लॉकडाऊन लावण्याचा विचार नसल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुंबईची लोकल ट्रेन बंद होणार असल्याचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही असेही ते म्हणाले. दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कशा पद्धतीने आटोक्यात आणता येईल, यावर बैठकित चर्चा झाली असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number