महाराष्ट्रातील चार महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने नारीशक्ती पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण २८ महिलांना नारीशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार महिलांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातील चार महिलांमध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोम […]

महाराष्ट्रातील चार महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने नारीशक्ती पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण २८ महिलांना नारीशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार महिलांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्रातील चार महिलांमध्ये कथक नृत्यांगना डाऊन सिंड्रोम प्रभावित सायली आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे, तर मधुलिका रामटेके यांनी महिलांसाठी बॅंक सुरु केली आणि आता या बॅंकेच्या ५३७२ शाखा आहेत, सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना नारी शक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे यांना पुरस्कार देण्यात आला.

२०२०च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांमध्ये उद्योजकता, कृषी, नवकल्पना उपक्रम, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, एसटीईएमएम आणि वन्यजीव संवर्धन अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा समावेश आहे. तसेच २०२१च्या नारी शक्ती पुरस्कार विजेत्या महिलांमध्ये भाषाशास्त्र, उद्योजकता, कृषी, सामाजिक कार्य, कला आणि हस्तकला, मर्चंट नेव्ही, एसटीईएमएम, शिक्षण आणि साहित्य, दिव्यांग अधिकारासाठी कार्य करणाऱ्या महिला यांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number