मनपा अर्थसंकल्प २०२२ : मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंक्लप सादर करण्यात आले. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७८११.५७ कोटी रुपयांवरुन ३७५३८.४१ कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये ९७२६.८४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ३०८५१.१८ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ३०७४३.६१ कोटी […]

मनपा अर्थसंकल्प २०२२ : मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंक्लप सादर करण्यात आले. २०२१-२२ या आर्थिक वर्षाचे महसूली उत्पन्नाचे अर्थसंकल्पीय अंदाज २७८११.५७ कोटी रुपयांवरुन ३७५३८.४१ कोटी असे सुधारीत करण्यात आले असून त्यामध्ये ९७२६.८४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

दिनांक ३१ जानेवारी २०२२ पर्यंत ३०८५१.१८ कोटी इतके प्रत्यक्ष उत्पन्न प्राप्त झाले आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरीता अंदाजित महसूली उत्पन्न ३०७४३.६१ कोटी रुपये एवढे प्रस्ताविले असून ते सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या तुलनेत २९३२.०४ कोटी रुपयांनी जास्त आहे.

मनपा शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. उपायुक्त अजित कुंभार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांच्याकडे महापालिकेचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शिक्षण विभागाच यंदाचा अर्थसंकल्प ३३७० कोटी रुपयांचा आहे. तसेच यंदा केंब्रिज विद्यापिठाशी संलग्नित आयजीएससी आणि आयबी शाळांची उभारणी होणारअसून या नव्या २ शाळांकरता १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number