गोवा विधानसभा निवडणूक : भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. भाजपाकडून ६ उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. डिचोली मतदारसंघातून राजेश पाटणेकर, कळंगुट मतदारसंघातून जोसेफ सिक्वेरा, सांताक्रुज मतदारसंघातून टोनी फर्नांडीस, कुंभारजुवे मतदारसंघातून जेनिता पांडुरंग मडकईकर, कुठाळी मतदारसंघातून नारायण नाईक, कुडतरी मतदारसंघातून अंथोनी बार्बोझा […]

गोवा विधानसभा निवडणूक : भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे.

भाजपाकडून ६ उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. डिचोली मतदारसंघातून राजेश पाटणेकर, कळंगुट मतदारसंघातून जोसेफ सिक्वेरा, सांताक्रुज मतदारसंघातून टोनी फर्नांडीस, कुंभारजुवे मतदारसंघातून जेनिता पांडुरंग मडकईकर, कुठाळी मतदारसंघातून नारायण नाईक, कुडतरी मतदारसंघातून अंथोनी बार्बोझा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

उत्पल पर्रिकर पणजीतून अपक्ष लढणार

उत्पल पर्रीकर यांनी गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात पणजीमधून अपक्ष निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. उत्पल पर्रीकर म्हणाले, ‘मतदारांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिले होते. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजीत पक्ष मजबूत करायचा असून वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले. तसेच, मला पणजीतून उमेदवारी देण्यात आली नाही. दोन वर्षांपूर्वी आलेल्यांना पणजीमध्ये तिकिट देण्यात आले. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष निवडणूक लढणार आहे,’  असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number