येरवडा दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

पुण्यात येरवाड्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर पाच कामागर गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, येरवडा दुर्घटनेची राज्य सरकारने दखल घेत येतील दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. येरवडायेथली दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री […]

येरवडा दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

पुण्यात येरवाड्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर पाच कामागर गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, येरवडा दुर्घटनेची राज्य सरकारने दखल घेत येतील दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे.

येरवडायेथली दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले असून, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपायंची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे, तर जखमी कामगारांवर उपचार करताना काळजी घेण्यात यावी, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.

दुर्घटनेप्रकरणी चौघांना अटक

येरवडायेथील शास्त्रीनगरमध्ये असलेल्या गल्ली क्रमांक आठमध्ये गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेमध्ये ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर पाच कामागर गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असून चौघांना अटक केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number