विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई, १४ मे २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. या चार जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार होते, तर १३ जूनला मतमोजणी केली जाणार होती. ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणुकीचे नवे वेळापत्रक निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार आहे. 

शाळा, महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्या सुरू आहेत. शिवाय राज्यात लोकसभेसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होणार आहे.  यामुळे विधानपरिषदेसाठी मतदान होईल त्यावेळी बहुसंख्य मतदान मतदारसंघाबाहेर असण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करणारी लेखी निवेदने सादर झाली. या निवेदनांची दखल घेत निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number