दिल्लीतील काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे अपघातात निधन

गाड्यांच्या भरधाव वेगामुळे आणि वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक अपघात होत असतात. दिल्लीतही सोमवारी बलेनो आणि ब्रेझा कार यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बड्या काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोथिया यांच्या पत्नी मधु लिलोथिया यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी काश्मिरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत […]

दिल्लीतील काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे अपघातात निधन

गाड्यांच्या भरधाव वेगामुळे आणि वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक अपघात होत असतात. दिल्लीतही सोमवारी बलेनो आणि ब्रेझा कार यांच्यात अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बड्या काँग्रेस नेत्याच्या पत्नीचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. दिल्ली काँग्रेसचे माजी आमदार राजेश लिलोथिया यांच्या पत्नी मधु लिलोथिया यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी काश्मिरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मधु लिलोथिया या बलेनो कारमधून प्रवास करत असताना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या ब्रेझा कारने धडक दिली. मधु यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले. पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. जैनुल असे आरोपीचे नाव असून तो सीलमपूरचा रहिवासी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number