परमबीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारला झटका दिला आहे. परमबीर सिंह यांचे निलंबन तूर्तास कायम असून एका आठवड्यात परमबीर सिंह यांच्यावर दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला सोपवावीत, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंह यांच्यावरी गुन्ह्यांचा तपास मुंबई […]

परमबीर सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारला झटका दिला आहे. परमबीर सिंह यांचे निलंबन तूर्तास कायम असून एका आठवड्यात परमबीर सिंह यांच्यावर दाखल असणाऱ्या सर्व गुन्ह्यांची कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला सोपवावीत, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

परमबीर सिंह यांच्यावरी गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरू होता. मात्र, आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली असून सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

परमबीर सिहं प्रकरणात राज्यातील यंत्रणेवर आरोप केले आहेत, राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी हा तपास सीबीआयकडे देण्यात आले असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. तसेच परमबीर सिंह यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number